दुर्दैवाने ‘अभिजनवादी इतिहास’ हा ‘लोकप्रिय इतिहासा’पेक्षा अधिक लोकप्रिय आहे. कारण सत्तारूढ वर्गाची समाजावरील वर्चस्ववादी पोलादी पकड. म्हणून खऱ्या अर्थानं इतिहास राज्यशास्त्राची ‘बालवाडी’ आहे!
भूतकाळात जे इतिहासलेखनाचे काम झाले आणि जेवढेही ऐतिहासिक ग्रंथ लिहिले गेले (उदा., मिथके, कविता, पोवाडे, राजा-राणीच्या कथा किंवा पुराण इ), ते सर्व लिखाण शिक्षित लोकांनीच केलेले आहे. आणि ही सर्व शिकली-सवरलेली मंडळी सामान्यतः अभिजन वर्गातूनच आलेली असत. तर हे ठरलेलं गणित आहे - त्यांच्या सर्व इतिहासलेखनात एकच ‘अभिजनवादी तत्त्व’ आढळून येते.......